विजय गोळेसर सतराव्या शतकात ज्यावेळेस मुघलांचे राज्य होते, त्यावेळेस महाप्रभूंना एका मुस्लीम राजाने सांगितले तुम्ही या दगडाच्या गाईची एवढी पूजा का करता, ती जर खरंच पवित्र असेल आणि खरंच सत्यनिष्ठ असेल तर ही गाय गवत खाऊ शकेल का? महाप्रभूंच्या विनंतीवरून दगडाच्या त्या गाईनेदेखील गवत खाल्ले ते पाहून मुस्लीम राजा नतमस्तक झाला आणि तिचे मंदिर न […]
विजय गोळेसर
सतराव्या शतकात ज्यावेळेस मुघलांचे राज्य होते, त्यावेळेस महाप्रभूंना एका मुस्लीम राजाने सांगितले तुम्ही या दगडाच्या गाईची एवढी पूजा का करता, ती जर खरंच पवित्र असेल आणि खरंच सत्यनिष्ठ असेल तर ही गाय गवत खाऊ शकेल का? महाप्रभूंच्या विनंतीवरून दगडाच्या त्या गाईनेदेखील गवत खाल्ले ते पाहून मुस्लीम राजा नतमस्तक झाला आणि तिचे मंदिर न तोडता तो तिथून निघून गेला, अशीदेखील कथा या बहुला गायीबद्दल सांगितली जाते.
ब्रजभूमीतील 84 कोस परिक्रमेतील सर्वच वनं निसर्गसंपन्न आहेत. बहुलावनदेखील याला अपवाद नाही. मथुरेपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेले बहुलावन परम सुंदर आणि अतिशय रमणीय आहे. हल्ली हे स्थान ‘बाटी’ या नावाने ओळखले जाते, कारण पूर्वी जेथे बहुलावन होते तेथे आता ‘बाटी’ नावाचे एक सुंदर गाव वसले आहे.
दगडी मूर्तीने खाल्ले गवतपद्मपुराणात अतिशय प्रसिद्ध असलेल्या बहुला नावाच्या गाईवरून या वनाला बहुलावन असे नाव मिळाले आहे. प्राचीन काळापासून अनेक पौराणिक ग्रंथातदेखील या सत्यनिष्ठ बहुला गायीची कथा किंवा आख्यायिका आपल्याला वाचायला मिळते, परंतु सतराव्या शतकात ज्यावेळेस मुघलांचे राज्य होते, त्यावेळेस महाप्रभूंना एका मुस्लीम राजाने सांगितले तुम्ही या दगडाच्या गाईची एवढी पूजा का करता, ती जर खरंच पवित्र असेल आणि खरंच सत्यनिष्ठ असेल तर ही गाय गवत खाऊ शकेल का? महाप्रभूंच्या विनंतीवरून दगडाच्या त्या गाईनेदेखील गवत खाल्ले ते पाहून मुस्लीम राजा नतमस्तक झाला आणि तिचे मंदिर न तोडता तो तिथून निघून गेला अशीदेखील कथा या बहुला गायीबद्दल सांगितली जाते. बहुला गाईचे किंवा बहुला देवीचे हे मंदिर आजही आपल्याला बहुलावनातील संकर्षण कुंडाच्या काठावर असलेले पाहायला मिळते.
बहुला कोण होती?श्रीहरीच्या एका पत्नीचे नाव आहे बहुला! बहुला नावाच्या श्रीहरीच्या सखीचे हे निवासस्थान ब्रजभूमीतील बारावनातील पाचवे वन आहे. असे म्हणतात की जे भक्त या वनाचे दर्शन घेतात त्यांना मृत्यूनंतर अग्नि लोक प्राप्त होतो.
श्रीकृष्णाच्या बहुला नावाच्या गाईची पौराणिक कथा या वनाशी निगडित आहे. मथुरेच्या पश्चिमेला राधाकुंड आणि वृंदावन यांच्या अगदी मध्यभागी बहुलावन वसलेले आहे. याच वनात श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या असंख्य गोप सवंगड्यांसह गाई चारण्यासाठी जात असत. बहुलावनाची परिक्रमा सुमारे सहा किलोमीटर लांबीची आहे. येथील प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे संकर्षण कुंड, माना सरोवर, बहुलादेवी मंदिर आणि योग माया मंदिर या प्रत्येक स्थानाचा महिमा प्राचीन पौराणिक ग्रंथातदेखील वर्णन केलेला आहे.
ज्यामुळे या वनाला बहुलावन असे नाव मिळाले त्या बहुला नावाच्या सत्यनिष्ठ गायीची कथा पद्मपुराणात प्रसिद्ध आहे. या कथेनुसार भगवान श्रीहरीची पत्नी होण्यापूर्वी बहुलाला याच वनातील जंगलात एका गाईचा जन्म मिळाला होता आणि तिच्या चारित्र्याची म्हणजे सत्यनिष्ठेची परीक्षा खुद्द भगवंतांनी घेतली होती तीदेखील याच वनात.
एके दिवशी या वनात राहणार्या ब्राह्मणाने आपल्या बहुला नावाच्या गाईला गवत खाण्यासाठी या वनात सोडले. या वनातले ताजे लुसलुशीत गवत गाईला मिळावे यासाठी त्याने तिला या वनात सोडले होते. ही गाय गवत खात असताना एक अत्यंत भुकेला वाघ तिच्या समोर आला. तो वाघ गाईला मारणार तेवढ्यात घाबरलेली गाय त्या वाघाला म्हणाली, वाघोबा कृपा करून मला आता मारू नको. मी माझ्या बछड्याला दूध पाजून पुन्हा येईन तेव्हा तू मला खा. वाघाने गाईच्या शब्दांवर विश्वास ठेवला. तो म्हणाला, तू येथेच ये मी तुझी येथे वाट पाहत थांबतो. गाय घरी गेली. तिने आपल्या वासराला दूध पाजले आणि पुन्हा ती आपल्या वासरासह वाघाकडे परत आली, परंतु तिथे आता वाघ नव्हता तर वाघाच्या रूपातील श्रीहरी तेथे उभे होते. गायीची सत्यनिष्ठा पाहण्यासाठी त्यांनीच वाघाचे रूप घेतले होते. गाईचा प्रामाणिकपणा आणि सत्य निष्ठा पाहून भगवान तिच्यावर प्रसन्न झाले आणि पुढील जन्मात तुला भगवंताची पत्नी म्हणून मान मिळेल, असा त्यांनी तिला वर दिला.
बहुला वनात राधा कृष्णाची अनेक मंदिरं आहेत, परंतु सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते बहुला देवी मंदिर. इथल्या संकर्षण तलावाइतकेच हे मंदिर प्राचीन आहे. या मंदिरात बास रिलीफमध्ये कोरलेली बहुलादेवी गायीच्या रूपात आपल्या वासरासह दिसते तर बाजूला भगवान श्रीकृष्ण आणि यमराज उभे असलेले दिसतात. बहुलादेवी मंदिराच्या जवळच योगमाया म्हणजे देवी दुर्गेचे मंदिर आणि त्याच्या बाजूला भगवान बांके बिहारी मंदिर आहे.
संकर्षण कुंड आणि माना सरोवरपूर्वी संकर्षण कुंड आणि माना सरोवर वेगवेगळे होते, परंतु 50 वर्षांपूर्वी या कुंडांची खोदाई आणि सफाई करणार्यांनी ही दोन्ही कुंडे एकत्र करून त्यांच्या चारी बाजूंनी चिरेबंदी घाट बांधले आहेत. पूर्वी संकर्षण कुंड बहुला देवी मंदिराच्या जवळ होते. या कुंडाला बहुला कुंड या नावानेही ओळखले जाते. माना सरोवराला ‘कृष्णकुंड’ किंवा ‘माना सरशी’ नावानेही ओळखतात. चैत्र महिन्यात (मार्च एप्रिल) या कुंडात स्नान करणार्यांना देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण दर्शन देतात, असे पुराणात वर्णन केले आहे.
माना सरोवराची आख्यायिकाएकदा श्रीकृष्ण आणि राधा याच परिसरात आपल्या दिव्य लिलांचा आनंद घेत असताना काही कारणाने राधा राणीला अचानक राग आला. इर्षा आणि क्रोधाने रागावलेली राधा राणी एकटीच बहुलावनात आली आणि या कुंडाजवळच्या एका वेलींच्या कुंज्याखाली रुसून बसली. राधेला शोधत शोधत कृष्ण येथे आले आणि राधा राणीचा रुसवा दूर करण्यासाठी ते राधेला शरण गेले. श्रीकृष्णाने माफी मागितलेली पाहून राधाराणीचा राग क्षणार्धात निवळला आणि ती खुदकन हसली. ज्या कुंडाजवळ राधा राणी रागावून बसली होती ते कुंड माना सरोवर किंवा मनसरोवर म्हणजे राधाराणीच्या रागाचे प्रतीक म्हणून माना सरोवर किंवा माना कुंड नावाने प्रसिद्ध झाले.
चैतन्य महाप्रभू लीलाचैतन्य महाप्रभूंच्या सहवासानेदेखील बहुलावन पावन झालेले आहे. चैतन्य महाप्रभू या बहुलावनात आले तेव्हा तर एक गंमतच झाली. चैतन्य चरित्रामृत ग्रंथात हा सर्व प्रसंग अतिशय रसभरीत वर्णन केला आहे. जेव्हा भगवान चैतन्य महाप्रभू बहुला वनातून जात होते तेव्हा तिथे चरणार्या असंख्य गाई त्यांच्याभोवती जमा झाल्या. त्यांनी त्यांना घेराच घातला आणि त्या सर्व गाई एका सुरात हंबरू लागल्या. त्यावेळी चैतन्य महाप्रभू भगवान श्रीकृष्णाच्या गाई चारणार्या रूपाचे ध्यान करू लागले. त्यावेळी इथल्या असंख्य गाई त्यांचे शरीर चाटू लागल्या. चैतन्य महाप्रभूदेखील प्रत्येक गाईला आपल्या गळ्याशी लावू लागले. यावेळी जंगली हरणे देखील त्यांच्याभोवती जमा झाली आणि असंख्य मोर त्यांच्या भोवती पिसारा फुलवून नाचू लागले. जणू साक्षात भगवान श्रीकृष्णच पुन्हा एकदा बहुलावनात अवतरले होते. काही वेळाने चैतन्य महाप्रभूंची समाधी भंग पावली आणि सभोवताली जमलेल्या असंख्य गाई, हरणं, मोर यांच्याकडे प्रेमळ दृष्टी टाकून ते पुढे वृंदावन परिक्रमेला निघून गेले.
बहुलावनात आता संकर्षण तलाव आणि त्याभोवती असलेली ‘बहुलादेवी’, ‘योग माया’, ‘बहुला बिहारी मंदिर’ आणि चैतन्य महाप्रभूंची बैठक ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. मात्र बहुलादेवीचे पुजारी आणि बाटी गावातले नागरिक आजही हजारो वर्षांनंतर वाघाला दिलेल्या वचन पाळणार्या बहुला गाईची कथा त्यांच्या ब्रज भाषेत रंगवून रंगवून सांगतात.
बहुलावनातील बहुला बिहारी मंदिर, बहुला कुंड, संकर्षण कुंड, यांच्याप्रमाणेच पुष्टी मार्गातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री महाप्रभूजी यांची बैठक ही अतिशय पूजनीय आहे.
| # | Наименование новости | Тональность | Информативность | Дата публикации |
|---|---|---|---|---|
| 1 | Корова думает, что пёс её детеныш | 5 | 3 | 15-07-2026 |
| 2 | The GOAT: Hooved friend provides moral support to firefighters in Colorado | 7 | 6 | 10-07-2026 |
| 3 | Arrival of Herders and Cows on the Alpine Pasture | 0 | 6.16 | 08-06-2026 |
| 4 | Urteil in Frankfurt: Dackel frisst Gift – Besitzerin darf Restaurant kritisieren | 0 | 10 | 07-08-2026 |
| 5 | Undvek rådjur – krockade mot träd | 0 | 5 | 27-06-2026 |
| 6 | Вампир-сатанист оставлял ритуально убитых оленей и ягнят рядом с церквями | 0 | 20 | 04-08-2026 |
| 7 | Дикий слон 14 лет преследовал семью, нашел ее и расправился с женщиной и ребенком | -10 | 7 | 06-07-2026 |
| 8 | The Mouse, his House and me | 0 | 7.44 | 17-04-2026 |
| 9 | El señor de las moscas | 0 | 5 | 16-05-2026 |